Skip to content Skip to footer

कोरोना अपडेट : खासदार निधीतून एक कोटी खर्च करणेबाबत खा. माने यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र.

कोरोना अपडेट : खासदार निधीतून एक कोटी खर्च करणेबाबत खा. माने यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र.

जगा पाठोपाठ आता देशात आणि राज्यात सुद्धा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून १ कोटीचा निधी मदतकार्यासाठी खर्च करण्याचे जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे.

सध्या हातकणंगले मतदारसंघातील वाळवा तालुक्यात २३ व पेठवडगाव येथे १ कोरोना रुग्ण आढळले आहेत. मतदारसंघातील कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ, शाहूवाडी, पन्हाळा व सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिरोळ तालुक्याचा कोरोना बाधितांमध्ये समावेश आहे. या तालुक्यांमध्ये इचलकरंजी, पेठ वडगाव, हुपरी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ, मलकापूर यासारख्या मोठ्या शहरांचा आणि ग्रामीण भागाचा समावेश खासदार माने यांच्या मतदारसंघात होतो.

कोरोना-अपडेट-खासदार-निधी-Corona-Update-MP-Fund

आज दिवसरात्र कोरोनाच्या संसर्गासाठी व लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी राज्यात लागू झालेल्या लॉक डाऊनदरम्यान डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी, होमगार्ड अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या देखील सुरक्षेची काळजी घेण्यासाठी मास्क, सेनिटायझर आणि वैद्यकीय किट यागोष्टी उपल्बध करून देण्यासाठी माझ्या स्थानिक विकास निधीतून १ कोटी खर्च करण्यात यावे, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना खा. माने यांनी दिले आहे.

Leave a comment

0.0/5