Skip to content Skip to footer

कुटुंबासोबत वेळ मिळत आहे, तो हसत खेळवत घालावा! – मुख्यमंत्री

कुटुंबासोबत वेळ मिळत आहे, तो हसत खेळवत घालावा! – मुख्यमंत्री

देशात आणि राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. तसेच त्यांना पुढेचे काही दिवस घरातच राहण्याचा मोलाचा सल्ला सुद्धा दिला. आज कोरोनाचा प्रसार हा गुणाकार पद्धतीने वाढत असून, जर आपण सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन न करता विनाकारण घराबाहेर पडत राहिलो तर येणाऱ्या दिवसात त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल. याची आठवण सुद्धा मुख्यमंत्र्यांनी करून दिली.

तसेच मुख्यमंत्र्यांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास उघडी ठेवण्याचा निर्णय धाडसी असल्याचं सांगत जनतेला दुकानांमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “संकटाच्या मागे हात धुवून लागायचं आहे. जीवनाश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरु राहणार आहेत. हे आम्ही वारंवार सांगत आहोत. काही ठिकाणी काहीही कारण नसताना झुंबड होत असल्याचं कळालं. आम्ही गर्दी करु नका असं आवाहन वारंवार करत आहोत”. “काही प्रमाणात वाहतूक सुरुच आहे. या गोष्टी लक्षात येत आहेत. त्याप्रमाणे सूचना देत आहोत.

शेतीविषयक मजुरांची ये जा थांबता कामा नये. अन्नधान्य पुरवठा करणारी मालवाहतूक थांबवता येणार नाही. ती चालू आहे,” असं देखील उद्दव ठाकरेंनी प्रामुख्याने सांगितलं.

Leave a comment

0.0/5