Skip to content Skip to footer

कोरोना अपडेट : शिवभोजन थाळी आता पाच रुपयांत मिळणार.

कोरोना अपडेट : शिवभोजन थाळी आता पाच रुपयांत मिळणार.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मजुरांच्या आणि कष्टकरी कामगारांच्या हातचे काम बंद पडले आहे. याच कारणामुळे गोरगरीब, कामगार, शेतकरी व मजूर उपाशी राहू नये, यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात येणार आहे. राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा अन्न, नागरी पुरवठा विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.

यासाठी राज्य सरकारने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Leave a comment

0.0/5