Skip to content Skip to footer

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात – युवासेना सचिव वरुण सरदेसाई.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात – युवासेना सचिव वरुण सरदेसाई.

एकीकडे संपूर्ण देशातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारचे कोरोना विरुद्धच्या लढाईत ते करत असलेल्या कामांवरून कौतुक होत आहे. तर दुसरीकडे काही विरोधक मात्र या परिस्थितीला रोखण्यात महाराष्ट्र सरकार व मुख्यमंत्र्यांना अपयश आले आहे, हा वाढत आकडा सरकारचा अकार्यक्षमपणाचा परिणाम आहे अशा टीका आता विरोधकांकडून ऐकण्यात येत आहेत.

https://www.facebook.com/varun.sardesai/videos/10222271782599785/

परंतु आज विरोधकांना सडेतोड व मुद्देसूद उत्तर देण्यासाठी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी कंबर कसली आहे. आज त्यांनी विरोधकांना विडिओ प्रसारित करून उत्तर दिले आहे. महाराष्ट्रात विमान प्रवासाने येणारे परदेशी प्रवाशांची संख्या जास्त असून, इतर राज्याच्या तुलनेत मुंबई विमानतळावर अधिक लोक येत असतात. त्यामुळे साहजिकच कोरोनाची लागण असलेले रुग्णांचा आकडा महाराष्ट्रात जास्त दिसून येत आहे. परंतु लोकसंख्या व इतर बाबींची माहिती घेतल्यास महाराष्ट्रात परिस्थिती सरकार योग्य पद्धतीने सांभाळत आहे, असे ही ते म्हणाले.

Leave a comment

0.0/5