रोहयोच्या मदतीने करणार फळबागा सफाईचे काम – कृषी मंत्री दादा भुसेंची घोषणा

रोहयोच्या मदतीने करणार फ-With the help of Rohyo will do f

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्य़ात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे आठवडा भरात पूर्ण होतील ढोबळमानाने जिल्ह्य़ात २२ हजार कृषीक्षेत्र बाधित आहे. फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून या नेस्तनाबुत झालेल्या बागांची पुन्हा उभारणी केली जाईल, फळबागांच्या साफसफासाठी रोजगार हमी योजनेची मदत घेण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.

कृषी मंत्री भुसे यांनी  रायगड जिल्ह्य़ातील वादळग्रस्त भागांना भेट देवून नुकसानीची पाहणी केली तसेच नागरीक व शेतकऱ्यांशी संवाद साधला . यावेळी त्यां च्या समवेत पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.  त्यानंतर जिल्हाीधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांना फळबागा दुरूस्तं करण्यासाठीदेखील मोठा खर्च येणार आहे हे काम रोजगार हमी योजनेतून घेतले जाईल , असे त्याांनी सांगितले .

करोनामुळे  मुंबईकर चाकरमानी मोठय़ा संख्ये्ने कोकणातील आपल्यो गावी आले आहेत . हे लक्षात घेवून यावेळच्याम खरीप हंगामाची तयारी करण्या्त आली आहे . यंदा खरीप हंगामात कोकणात १० हजार क्षेत्र वाढेल असा अंदाज असून त्या दृष्टीने नियोजन करण्या त आले आहे . खते बियाणे यांचा वाढीव पुरवठा करण्यात येणार असल्याचेही दादा भुसे यांनी  स्पष्ट केले .

अर्धवट तुटलेल्या झाडांचे पुनरूज्जीवन

यावेळच्या चक्रीवादळात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे . त्यात झाडे उन्मळळून पडली आहेत तर काही झाडं ही अर्धवट तुटलेल्यो अवस्थेत आहेत . नवीन लागवड केल्यातनंतर त्याअपासून उत्पन्न मिळण्यात वेळ जाणार आहे. हे लक्षात घेवून अर्धवट तुटलेल्या झाडांचे पुनरूज्जीपवन करता येईल का यादृष्टीने प्रयत्नकरणार असून त्यासाठी कृषी विद्यापीठाची मदत घेतली जाणार आहे. विद्यापीठाचे पथक लवकरच येवून याबाबत पाहणी करेल असेही दादा भुसे यांनी सांगितले .

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here