Skip to content Skip to footer

विद्युत पूरवठा करणाऱ्या यंत्रणेचे काम जलद गतीने करण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी कसली कंबर..!

विद्युत पूरवठा करणाऱ्या यंत्रणेचे काम  जलद गतीने करण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी कसली कंबर..!

मागील आठवड्यात झालेल्या चक्रीवादळामुळे विजेचे खांब, तारा व इतर विद्युत पूरवठा करणाऱ्या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान दापोली खेड व मंडणगड येथे प्रामुख्याने झाले आहे. तसेच विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना दैनंदिन जीवनात देखील त्रास होत आहे. तसेच महावितरण विभागाच्या इतर कामांसंदर्भात दापोली येथे विशेष आढावा बैठक आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत पार पडली.

विद्युत-पूरवठा-करणाऱ्या/Power-supply

सदर बैठकीत खासदार श्री. विनायकजी राऊत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची विशेष उपस्थितीत पार पडली. तरी ‘सर्व नागरिकांनी धीर धरावा’ असे आव्हान या प्रसंगी आमदार योगेश कदम यांनी केले. विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत असे देखील त्यांनी याप्रसंगी सांगितले.

Leave a comment

0.0/5