Skip to content Skip to footer

…..यासाठी पूजेतून बाहेर आले होते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे.

…..यासाठी पूजेतून बाहेर आले होते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे.

पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारी महापूजेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्याच्या हस्ते पूजा ही सुरु असताना त्यांनी देखील अतिशय उत्साहाने सर्व विधीमध्ये रुची दाखवल्याचे बघायला मिळाले होते. परंतु डी-हायड्रेशन होत असल्याने त्यांना काही काळ अस्वस्थता झाली व ते पूजेतून काही वेळेसाठी बाहेर आले. याच मुद्द्याला पकडत विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

यासाठी-पूजेतून-बाहेर-आले-For-came-out-of-worship

परंतु आता स्वतः आदित्य ठाकरे यांनी अतिशय नम्रपणे नेमकं मंदिरात काय घडले व का त्यांना बाहेर यावे लागले, यावर पूर्णविराम लावला आहे. पूजेदरम्यान आदित्य ठाकरेंना डी-हायड्रेशन होत असल्याने त्यांना काही काळ अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे बाहेर येऊन रिहाइड्रेट (पाणी पिऊन व मोकळा श्वास घेऊन) होऊन ५-७ मिनिटात ते उर्वरित पूजेत पुन्हा सहभागी झाले. हा संपूर्ण प्रसंग त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे. तसेच माझी प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या सर्वांचे आभार, असे देखील ते म्हणाले.

Leave a comment

0.0/5