Skip to content Skip to footer

“राणेंना पुन्हा एकदा धडा शिकवण्याची वेळ आली आहे.” – विनायक राऊत

पुन्हा एकदा कोकणात शिवसेना खासदार विनायक राऊत आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्यात वाद झालेला पाहायला मिळत आहे. त्यात राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळत असल्याची जोरदार चर्चा रंगलेली असताना यावर आता राऊत यांनी भाष्य केले आहे.

“एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल.” अशी बोचरी टीका विनायक राऊतांनी केली. “बुडत्याला काडीचा आधार.” असे म्हणत राऊत यांनी राणेंना टोला लगावला होता.

त्यात राऊतांनी केलेल्या टीकेला निलेश राणे यांनी अत्यंत खालच्या थराच्या शब्दांत राऊतांचा समाचार घेतला. “विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि ‘थापे’बाज आहे.” असा घणाघात त्यांनी केला होता.

आता पुन्हा एकदा राऊत यांनी राणे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. “निलेश राणे यांच्या या बकवासगिरीला कोकणातील जनतेने एकदा नाही तर दोनदा धडा शिकवला आहे. मारामारीची, अरेरावीची, शिवीगाळीची भाषा निलेश राणेंनाच शोभते इतर कोणाला शोभत नाही. कोकणवासीय सुज्ञ आहेत, तसेच राणेंना पुन्हा एकदा धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे’ अशी टीका त्यांनी केली आहे.

Leave a comment

0.0/5