Skip to content Skip to footer

प्रभू रामचंद्र भारतीय नव्हे, नेपाळी पंतप्रधानांचा नवा शोध

प्रभू रामचंद्र भारतीय नव्हे, नेपाळी पंतप्रधानांचा नवा शोध

              नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांची खुर्ची धोक्यात येत असलेले कळताच त्यांनी एक नवा जावई शोध लावला आहे. खरी अयोध्यानगरी भारतात नसून नेपाळमध्ये आहे, तर प्रभू रामचंद्रही नेपाळी होते असा दावा के पी ओली यांनी केला आहे.
              आपली सत्ता जात असल्याचे पाहून ओली यांना नव-नवीन कल्पना सुचत आहे. सोमवारी त्यांनी दावा केला की सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने ‘बनावट अयोध्या’ तयार केली आहे. मात्र खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे. त्यावेळी आधुनिक वाहतूक आणि मोबाईल फोनसारखी दळणवळणाची साधने नव्हती, मग राम जनकपुरात कसे आले? असा प्रश्न त्यांनी विचारला.

              भारत आपल्या विरोधात कात करत आहे असे आरोप त्यांनी लगावले आहे. मात्र जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी केपी ओली कधी नवीन नकाशात भारतीय प्रदेश दाखवत आहेत, तर कधी नेपाळमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार करण्यासाठी भारतातून आलेल्या लोकांना दोष देत आहेत.

Leave a comment

0.0/5