Skip to content Skip to footer

चार महिने सर्व सण साधेपणाने झाले बकरी ईद ही साधेपणाने साजरी करू- मुख्यमंत्री

चार महिने सर्व सण साधेपणाने झाले बकरी ईद ही साधेपणाने साजरी करू- मुख्यमंत्री
                   “वारकऱ्यांनी साधेपणाने वारी साजरी केली, लालबागच्या राजाने यावर्षी प्रतिष्ठापणा न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. बकरी ईदबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे मत मांडले. मुस्लीम धर्मीयांचा महत्त्वाचा सण बकरी ईदला कुर्बानीसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
                 गेल्या ४ महिन्यात सर्व सण सर्व समाज घटकांनी घरात साजरे केले. त्यामुळं मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या आणि जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत, किंबहुना नियंत्रित प्रमाणात उघडल्या आहेत. जुलै अखेरीस कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. ऑगस्टपासून जर हा आलेख वर गेला तर नियंत्रण कठीण होईल. कारण सर्व ताण काम करणाऱ्या यंत्रणांवर आहे.

चाकरमान्यांसाठी आमदार योगेश कदम यांनी केली ही मागणी वाचा….!

Leave a comment

0.0/5