Skip to content Skip to footer

मी भाजपा मध्ये जाणार नाही – सचिन पायलट

मी भाजपा मध्ये जाणार नाही -सचिन पायलट
 काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या आणि भाजपात प्रवेश करतील या आशेने बसलेल्या केंद्रातील भाजपा सरकारला बंडखोर नेते सचिन पायलट यांनी जोरदार धक्का दिला आहे. मी भाजपमध्ये जाणार नाही, अशी मोठी घोषणा राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केली.

            काँग्रेसने राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर सचिन पायलट पहिल्यांदा माध्यमांसमोर आपली सविस्तर प्रतिक्रिया देणार आहेत. सचिन पायलट यांच्या समर्थानात राजस्थान मधील काँग्रेसच्या ३०० पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिलेले आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये तिसरी आघाडी स्थापन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a comment

0.0/5