Skip to content Skip to footer

उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना फडणवीसांनी ‘मुख्यमंत्री’ उल्लेख टाळला…?

उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना फडणवीसांनी ‘मुख्यमंत्री’ उल्लेख टाळला…?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “मुख्यमंत्री” असा उल्लेख करणे टाळले होते. त्याच्या या वर्तुणुकीमुळे संपूर्ण राज्यभरातुन त्यांच्यावर टीकेची झोड उठू लागली आहे. सरकार आणि विरोधी पक्षात दुमत होतच मात्र कोणत्या वेळेला राजकारण करावे की नाही एवढी याचे भान फडणवीसांना राहिलेले नाही, अशीच चर्चा होऊ लागली आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1287611347828535296

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना सर्वस्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये ‘मुख्यमंत्री’ उल्लेख टाळण्यात आला आहे. ‘मा. उद्धवजी, आपणास वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, या शुभकामना!’, असे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5