Skip to content Skip to footer

पंतप्रधानांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…..!

पंतप्रधानांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…..!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे मुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो, त्याबरोबरच हा दिवस म्हणजे एक संधी असते. भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची ! मला विश्वास आहे की, आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल. आपल्याला वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की, त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे, असे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5