Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना तर्फे “युवा स्किल” उपक्रमाचा प्रारंभ !

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना तर्फे “युवा स्किल” उपक्रमाचा प्रारंभ !
सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटात अनेक तरुणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात निर्माण होणाऱ्या बेरोजगारीवर उपाय म्हणून तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी युवासेना प्रमुख मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि मार्दर्शनाखाली युवासेनातर्फे ‘युवा स्कील’ उपक्रमाची सुरूवात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आली आहे.

या “युवा स्कील” उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी सदर उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील तरुणांना आपल्या हक्काची नोकरी मिळावी तसेच व्यवसायात यश मिळावे हेच मुख्य उद्देश असल्याचे ही वरून सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.

Leave a comment

0.0/5