मुख्यमंत्र्यांच्या विरोधात टीका करणाऱ्या व्यक्तींच्या मागे नेमकं पाठबळ कोणाचे ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ट्विटरच्या माध्यमातून सुनैना होले या महिलेने आक्षेपार्ह टीका-टिपणी केली होती. त्या विरोधात युवा सेनेचे पदाधिकारी आणि वकील धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा सायबर विभागात नोंदविला गेला आहे.
पुढे सुनैना होले यांना अटक होऊन त्यांचा जामीन सुद्धा मंजूर करण्यात आला होता. विशेष करून त्यांच्या जामिनासाठी भाजप युवा मोर्चाचे देवांग दवे यांनी मदत केल्याचेही समोर आले होते. तसेच भाजपा केंद्रीय प्रवक्ता ताजिंदर पाल बग्गा यांच्या सांगण्यावरून दवे यांनी मदत केल्याचे उघड झाले होते.
आज राज्याच्या एका जबाबदार व्यक्तीवर अत्यंत खालच्या पातळीची टीका करणाऱ्या महिलेला भाजपा पाठीशी घालताना दिसत असल्याचे बोलल्या जात आहे. तर दुसरीकडे माजी खासदार किरीट सोमय्या आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सुनैना होले हिच्या चुकीच्या वर्तणुकीला उघड-उघड समर्थन दिल्याचे देखील बोलले जात आहे.
एकीकडे सुसंस्कृत पक्ष म्हणून देशात मिरवणाऱ्या भाजपा पक्षाच्या या वागणुकीवर आज किव येत आहे, अशा प्रकारच्या कॉमेंट्स आणि पोस्ट देखील व्हायरल होत आहेत. असेच काहीसे प्रकार सत्तेत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाने विरोधी पक्षात बसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाबरोबर सुरु केले होते. आता सत्ता हातात नसतानाही तेच प्रकार भाजपाने सत्तेत बसलेल्या शिवसेना पक्षाबरोबर चालवल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल….!