Skip to content Skip to footer

जळगावात सत्ताधारी भाजपाच्या विरोधात सेनेच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा……!

जळगावात सत्ताधारी भाजपाच्या विरोधात सेनेच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा……!
                      सध्या जळगाव शहरातील रस्त्याची प्रचंड दुर्दशा झालेली आहे. तर अनेक भागातील रस्त्याच्या मध्यभागी खड्डे पडून अपघाताच्या घटना घडताना दिसून येत आहे. याच पाश्वभूमीवर सत्तेत असलेल्या भाजपाला जागे करण्यासाठी विरोधी पक्षात बसलेल्या शिवसेनेने अनोख्या प्रकारे आंदोलन सुरु केले आहे. रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या खड्ड्यांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुत्रिम कमळाचे फुल सोडून विरोध दर्शवला होता.
              शहरातील सर्वच रस्ते अतिशय खराब झाले आहेत. मध्यंतरी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे पाईपलाइन टाकण्यासाठी शहरासह गल्ली-बोळातील रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले होते. हे काम संथगतीने सुरू असल्याने रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली होती. रस्त्यांवरील खड्डे, धूळ त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले होते.
               याच विषयाकडे सत्ताधारी भाजपचे लक्ष वेधण्यासाठी आज दुपारी शिवसेनेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये कमळाची आर्टिफिशियल फुले सोडून शिवसेनेने महापालिका प्रशासन तसेच सत्ताधारी भाजपचा निषेध नोंदवला होता.

Leave a comment

0.0/5