Skip to content Skip to footer

राणे भविष्य सांगणाऱ्यांच्या पक्षात, चिट्टी काढून पोपटासारखे भविष्य सांगतायत….!

राणे भविष्य सांगणाऱ्यांच्या पक्षात, चिट्टी काढून पोपटासारखे भविष्य सांगतायत….!
              राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाचे आघाडी सरकार जेमतेम सप्टेंबरपर्यंत चालेल, असे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केले होते. त्यांच्या या दाव्याला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रतिक्रिया दिलेली आहे. “नारायण राणे भविष्य सांगणाऱ्या पक्षात गेले आहेत. पोपटासारखं कागद काढून लोकांना भविष्य सांगणारा जो पक्ष आहे. त्या पक्षात त्यांचा प्रवेश झाल्यानंतर ते देखील पोपटासारखे बोलणारचं ना…” अशा शब्दात मंत्री मलिक यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे.
                    भविष्यवाणी करून राजकारण कधी चालत नाही. राजकारणात नंबर गेम असतो. त्यामुळे पोपटाने चिठ्ठ्या काढल्या आणि तसंच घडलं असं कधी होत नाही. भाजपमध्ये पोपटगिरी करणारे अनेक लोक आहेत. परंतू चिठ्ठ्यांवर सरकार चालत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असे सुद्धा मलिक यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5