Skip to content Skip to footer

राजकीय मानवी हत्यांची पुर्नतपासणी करण्याची खासदार विनायक राऊत यांची मागणी….!

राजकीय मानवी हत्यांची पुर्नतपासणी करण्याची खासदार विनायक राऊत यांची मागणी….!

राजकीय वैमान्यसातून झालेल्या चार हत्येचा छडा लावण्यासाठी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे. २००२ ते २०१३ या कार्यकाळात एकूण चार व्यक्तींची राजकीय वैमन्यासातून हत्या झाली होती. मात्र या हत्येचा छडा लावण्यास पोलिसांना अपयश आले होते. आता पुन्हा एकदा या हत्या कोणी केल्या याचा शोध घेण्यासाठी व तसेच दोषींवर कडक कारवाही करण्याची मागणी राऊत यांनी देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय किंवा वैयक्तिक स्वार्थापोटी मनुष्य वधाच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन सरकारमध्ये सामील असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थापोटी अथवा आशीर्वादाने सदर घटनेचा तपास योग्य दिशेने झालेला नाही, असे या पत्रात नमूद केले आहे.

या गुन्ह्यातील आरोपी सापडत नाही असे कारण देऊन सर्व प्रकरणे दफ्तरी बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे खऱ्या आरोपींना शिक्षा होऊ न शकल्यामुळे ते अजूनही मोकाटच आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याची धाक राहिलेली नाही. त्यामुळे पुन्हा त्यांच्या हातून समाज विघातक घटना घडण्याची चिंता राऊत यांनी व्यक्त केली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन या गुन्ह्यांच्या तपासणीची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

 

Leave a comment

0.0/5