Skip to content Skip to footer

नारायण राणे भाजपमध्ये नव्हे, एनडीएत जाणार – नवीन पक्षाच्या स्थापनेची घोषणा

काँग्रेसची कोंडी करण्यासाठी नारायण राणे सोबत हवेतही, पण त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या स्वभावामुळे – महत्त्वाकांक्षेमुळे होणारा ताप नको, अशा मनःस्थितीत असलेल्या भाजपनं अखेर राणेंशी हातमिळवणी करण्याचा फॉर्म्युला शोधून काढला आहे. त्यानुसार, नारायण राणे लवकरच स्वतःचा पक्ष स्थापन करतील आणि भाजपला पाठिंबा देऊन सरकारमध्ये सहभागी होतील, असं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.

नारायण राणेंचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास पाहून भाजपश्रेष्ठी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेतेमंडळींनी ही सावध खेळी केल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. या व्यवस्थेमुळे राणेंना एखादं पद दिलं की भाजपचं काम होऊन जाईल. राणेंच्या मुलांच्या जबाबदारीतून त्यांनी सोयीस्करपणे अंग काढून घेतलं आहे.

अधिक माहिती

Leave a comment

0.0/5