Skip to content Skip to footer

रोहा बलात्कार प्रकरणी गृहराज्य मंत्र्यांचे कडक कारवाहीचे आदेश…!

रोहा बलात्कार प्रकरणी गृहराज्य मंत्र्यांचे कडक कारवाहीचे आदेश…!

रोहा तांबडी येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. हे कृत्य करणाऱ्या सर्व नराधमांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याच पाश्वभूमीवर अटक करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाहीचे आदेश राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक व तपास अधिकारी यांना दिले आहेत. काल मंत्रालय येथे झालेल्या बैठकीत यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

देसाई म्हणाले, तांबडी येथील घटनेचा तपास जलदगतीने करावा, तपासात कोणत्याही तांत्रिक बाबींची उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषींवर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिले. गरज पडल्यास ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याबाबतही शासन स्तरावर विचार केला जात आहे.

Leave a comment

0.0/5