Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे यांच्यात काम करण्याची जिद्द – वर्षाताई गायकवाड

आदित्य ठाकरे यांच्यात काम करण्याची जिद्द – वर्षाताई गायकवाड

           पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे. ते एक सक्षम नेते आहेत अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिलेली आहे. ज्या मुंबई पोलिसांची स्कॉटलंडच्या पोलिसांबरोबर तुलना होते तेच मुंबई पोलीस सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणातील चौकशी करत आहे असे सुद्धा त्यांनी कौतुकास्पद उदगार मुंबई पोलिसांसाठी त्यावेळी  काढले.
              मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पद्म पुरास्कार समितीवर अध्यक्ष पदावर झालेली नेमणूक योग्यच आहे. जर एखादी व्यक्ती युवा असेल किंवा अनुभवी असेल, त्यांच्यात काम करण्याची जिद्द असणे महत्त्वाचे आहे. आदित्य यांच्यात ही जिद्द आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगलं काम केलं जाईल,” असेही त्यांनी सांगितले

Leave a comment

0.0/5