Skip to content Skip to footer

सेंट पॉल हायस्कूला युवासेनेचा दणका…!

सेंट पॉल हायस्कूला युवासेनेचा दणका…!

सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा, कॉलेज अद्याप सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात राज्यात सुरु करण्यात आलेली आहे. मात्र या संकटात सुद्धा काही कॉन्व्हेंट शाळांनी आपला मन-मर्जीचा कारभार सुरूच ठेवला आहे. मात्र
या विरोधात आता युवसेनेने आवाज उठवला आहे.

महाराष्ट्रातील मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्स, या कालावधीत वास्तविक शाळांना सुट्टी देण्यात येते. परंतु दादर येथील सेंट पॉल हायस्कूलने सत्र परीक्षेचे वेळापत्रक उत्सव काळात जाहीर केल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या शाळेत शिकणारे बहुतांश विध्यार्थी हे मराठी असल्यामुळे एकीकडे घरी गणेश उत्सव तर दुसरीकडे परीक्षांचे टेन्शन यामुळे विद्यार्थ्यां बरोबर पालकवर्ग सुद्धा चिंतेत पडला होता.

या शाळेच्या मनमानी कारभाराची दखल युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतल्यानंतर सदर प्रकरणी आमदार विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, शितल शेठ देवरुखकर, महादेव जगताप यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन या परीक्षा पुढे ढकलण्यात मागणी केली. तसेच मंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणाची दखल घेऊन त्यांनी त्वरीत कारवाईचे निर्देश दिले आहे. त्यामुळे युवासेनेच्या प्रयत्नाला यश येऊन अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a comment

0.0/5