Skip to content Skip to footer

खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे, मुख्यमंत्र्यांचे आदेश ….!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज दुपारी ठाणे, डोंबिवली आणि नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्यासोबत कोरोनाच्या पाश्वभूमीवर ठाणे महानगर पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित केली होती.

मात्र आज ठाणे शहरात येताना रस्त्यावर दिसणाऱ्या खड्डयांविषयी मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर हे खड्डे बुजवण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत . या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे आदी उपस्थित होते.

दरम्यान रस्त्यातील खड्ड्यांचा त्रास आपल्यालाही झाला याबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. खड्डे तात्काळ बुजविले जावेत आणि नागरिकांची खड्ड्यातून मुक्तता करावी असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमत्र्यांनी दिले.

 

Leave a comment

0.0/5