Skip to content Skip to footer

केजरीवाल विरोधात भाजपचे षडयंत्र वाचा

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातूनच दिल्लीकरांना स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री अर्थात अरविंद केजरीवाल मिळले होते. एकेकाळी अण्णा हजारेंचे शिष्य म्हणविल्या जाणाऱ्या केजरीवालांवर हजारे यांनी मात्र अनेकदा टीका केली होती. आता याचाच फायदा घेऊन भाजपाने रणनीती आखली आहे.

त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी हजारे यांना पत्र पाठवून केजरीवाल विरोधातील जनआंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. आजवर हजारेंनी केजरीवाल यांच्यावर टीका केली मात्र कधीही त्यांच्या विरोधात कृती केली नाही हाच मुद्धा पकडत आता हजारेंना शस्त्र बनवून केजरीवालांना अडचणीत आणायचा प्रयत्न भाजपा करताना दिसत आहे.

Leave a comment

0.0/5