Skip to content Skip to footer

भाजपचा मंदिर उघडण्याचा खोटा कळवळा म्हणजे राजकीय स्टंट – बबनदादा पाटील

आता भाजपला काहीही लोकहिताची काम राहिलेली नाहीत. म्हणून त्यांनी येत्या २९ तारखेला मंदीर उघडण्यासाठी

राज्यातील मंदिरांसमोर घंटानाद करण्याचा स्टंट करण्याचे ठरविले आहे. आधी आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी सगळ ‘काळ’ करून झाल आता हा नवा राजकीय स्टंट करत लोकांना धार्मिक मुद्द्यांवर भडकवण सुरू करत आहेत अशी टीका शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबन पाटील यांनी केली आहे.

पुढे बोलताना पाटील यांनी तिरुपती मंदिराचा दाखल देताना ते म्हणाले की, मुळात मंदिरांजवळील छोट्या छोट्या स्टॉलमुळे आपल आर्थिक जीवन अवलंबून असणार्यांची व्यथा आपण जानतो. तसेच जनतेची देवावर असलेली श्रद्धाही प्रचंड आहे. पण कोरोना हे भयानक संकट आहे जे गर्दीच्या ठिकाणी झपाट्याने संसर्ग पसरवते. उदाहरणा दाखल, ११ जुनला तिरुपतीच मंदिर भक्तांसाठी उघडल गेल आणि २ महिन्यात ७४३ मंदिरातील कर्मचारी आणि पुजाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याच समोर आल. त्यातील एकांचा मृत्यू ह्या कोविडमुळे झाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या नेतृत्वात राज्य सरकार जे निर्णय घेत आहे ते जनहितासाठी आणि तुमच्याआमच्या कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठीच घेते आहे. हे तुमच,माझ, आपल्या सर्वांच सरकार आहे. तेंव्हा लोकांनी अशा राजकीय खेळीला बळी पडू नये. देव आपल्या सर्वांची उत्तम काळजी घेतो आहे. देवाच्या कृपेनेच आज आपण सर्व सुरक्षित आहोत. आपणही आपली काळजी घ्या. सर्वांनी सुरक्षित रहा असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले आहे.

Leave a comment

0.0/5