Skip to content Skip to footer

पुणे येथील लसीच्या निष्कर्षांनंतर मुंबईत पालिकेची चाचणी करण्याचा निर्णय

नायर आणि केईएम रुग्णालयांमध्ये करोना लसीच्या चाचण्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याचा अंदाज महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी वर्तवला होता. मात्र पुण्यात सुरू असलेल्या चाचण्यांमधील शंभर स्वयंसेवकांवर या लसीचा परिणाम काय होतो याचा वैद्यकीय अभ्यास झाल्यानंतरच मुंबईमध्ये लस चाचण्या करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
या चाचणीमध्ये सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांच्या वैद्यकीय दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे मुंबई मनपाकडून सांगण्यात येत आहे. नैतिक समितीकडून चाचण्यांमधील काही बाबींसाठी मिळणारी संमतीसह प्रत्यक्ष ज्यांना लस देण्यात आली आहे त्यांच्यामधील लशीची परिणामकारकता तपासल्यानंतर मुंबईतील पुढील वैद्यकीय प्रक्रियेला गती येणार आहे.

Leave a comment

0.0/5