Skip to content Skip to footer

पुरबाधित घरांच्या आणि व्यवसायिकांच्या पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लावणार – मंत्री एकनाथ शिंदे

गडचिरोली जिल्हयातील दुर्गम भागात गेल्या आठवड्यामध्ये आलेल्या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच उदरनिर्वाहासाठी सुरु केलेला व्यवसाय सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन नुकसान झाले होते. याबाबत नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर परिस्थिती भागाची पाहणी करून पुरबाधितांच्या पुर्नवसनासाठी प्रशासनाकडून योग्य प्रक्रिया राबवचे अश्वासन दिले आहे.

यावेळी पुरबाधित झालेल्या १२० गावांमधील १०० गावांमध्ये नागरिकांना ब्लॅंकेट आणि जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी ८४०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप व १-१ ब्लॅंकेट वाटण्यात आले. यावर उर्वरित साहित्य वाटप येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात पालकमंत्री शिंदे म्हणाले की, प्रशासन भामरागडबाबत अतिशय संवेदनशील असून आवश्यक उपाययोजना तातडीने राबवित येणार आहेत. तालुकावासियांच्या पाठीशी पालकमंत्री म्हणून मी सदैव असणार आहे, असा दिलासा त्यांनी यावेळी नागरिकांना दिला.

Leave a comment

0.0/5