भारतापाठोपाठ अमेरिकेचा चीनला दणका ! वाचा…

भारतापाठोपाठ-अमेरिकेचा-च-India is followed by the United States

भारतापाठोपाठ अमेरिकेचा चीनला दणका ! वाचा…

भारताने चिनी बनावटीच्या एकूण ५० अ‍ॅपवर बंदी आणल्यानंतर आता अमेरिकेने सुद्धा भारताच्या निर्णयावर पाऊल ठेवत चीनला जोरदार दणका दिला आहे. अमेरिकेनेही चीनच्या दोन मोठ्या कंपन्यांना देशाच्या सुरक्षितेसाठी धोका असल्याचे सांगितले आहे. हुवैई टेक्नोलॉजी आणि झेडटीई कॉर्प या कंपन्यांना अमेरिकेने व्यवसाय करण्यास मनाई केली आहे.

अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेश कमिशनने मंगळवारी ५-० या मताच्या आधारे या कंपन्यांना देशासाठी धोकादायक असल्याचे सांगितले आहे. अमेरिकेने या कंपन्यांसोबत करारदेखील केला होता. या करारानुसार, ८.४ अब्ज डॉलर किंमतीच्या वस्तू, उपकरणे खरेदी करण्यात येणार होते. मात्र, यासाठीचा निधी देखील थांबवण्यात आला आहे.

अमेरिकेच्या या निर्णयानंतर दोन्ही कंपन्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अमेरिका फेडरल कम्युनिकेशन कमिशनने म्हटले की, टेलिकॉम कंपन्यांना आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमधून या दोन्ही कंपन्याच्या उपकरणांना हटवावे लागणार आहे. अमेरिकेच्या सुरक्षितेसोबत कोणतीही जोखीम घेणार नसल्याचेही कमिशनने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here