Skip to content Skip to footer

कोरोनाच्या पाश्वभूमीवर मुंबई पार पडणाऱ्या आधिवेशनसाठी सरकारकडून खास उपाययोजना

कोरोनाच्या पाश्वभूमीवर आज मुंबई पार पडणाऱ्या दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनासाठी ठाकरे सरकारकडून खास उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. प्रथमच हे अधिवेशन विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत पार पडणार आहे. त्यामुळे यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडेल. विधानसभा अध्यक्ष नाना पोटोले यांना कोरोनाची लागण लागल्यामुळे त्यांच्याजागी

नरहरी झिरवळ अध्यक्षस्थानी असणार आहे. मागच्या काही दिवसापासून आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे खबरदारीच उपाय म्हणून यंदा दोन दिवस चालणारे हे अधिवेशन कोरोनामुक्त चालावे असा मानस राज्य सरकारचा आहे.

आरोग्याच्या दृष्टीने सर्व आमदारांनी सभागृहात बसताना अंतर राखणे शक्य होणार नाही म्हणून त्यांची व्यवस्था प्रेषक गॅलरी आणि अधिकारी गॅलरीत करण्यात आली आहे. तसेच लोकप्रतिनिधीबरोबर त्यांच्या पीएना प्रवेश दिला जाणार नाही त्यांना विधानभवनाच्या बाहेर मंडप टाकून तिथेच खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ज्या आमदारांना इतर व्याधी आहेत त्यांची विषेश कायजी घेण्याचे आवाहन त्यांच्या-त्यांच्या पक्षाला करण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5