Skip to content Skip to footer

‘चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही’ ; वाचा कोणी केली ही जहरी टीका…

‘चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही’ ; वाचा कोणी केली ही जहरी टीका…

काही दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका-टिपण्णी केली होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील म्हणाले होते की, सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत.

 

तसेच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने सेस गोळा करण्याच्या केलेल्या घोषणेनंतर चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. यांच्या बापाची पेंड आहे का? अशा शेलक्या शब्दात चंद्रकांत पाटलांनी फटकारले होते. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी वक्तव्य केले आहे.

 

‘चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात’, असे म्हणत शिंदे यांनी पाटलांना टोला हाणला होता. तसेच मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची बाजारपेठ बनवायची आहे. राज्यात जी भाजपाची आंदोलने सुरु आहेत त्याचा बोलावता धनी कोण आहे ? असा प्रश्न आमदार शिंदे यांनी उपस्थित करत टीका केली होती.

Leave a comment

0.0/5