Skip to content Skip to footer

खासदार राहुल शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’ च्या वतीने नवरात्र उत्सवात अनोखा उपक्रम

कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांना शिधा पोहोचविणे, वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन कोरोना विषयी जनजागृती करणे, कोरोनाबधितांना पालिकेच्या आरोग्य केंद्रात पोहोचविणे असे महत्वाचे कार्य करणाऱ्या आरोग्यसेविका श्रीमती मंगला आनंद जगताप यांना ‘कोरोना रणरागिणी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.कोरोना संकटात उल्लेखनीय कार्य केलेल्या कतृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी, खासदार राहुल शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात रविवारी श्रीमती जगताप यांच्या वाशी नाका परिसरातील घरी जाऊन हा पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी खासदार शेवाळे, ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या अध्यक्षा सौ. कामिनी राहुल शेवाळे, नगरसेविका अंजली नाईक, विधानसभा संघटक निमिष भोसले, उपविभागप्रमुख राजेंद्र पोळ यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. अशाच रीतीने नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांत, आरोग्य सेविका, महिला पोलीस, परिचारिका, डॉक्टर्स यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

मुंबईच्या चेंबूर परिसरात राहणाऱ्या 56 वर्षीय श्रीमती मंगला जगताप या ‘आरोग्य सेविका’ म्हणून निरामय फाऊंडेशनसोबत गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत आहेत. मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील कुपोषित मुलांना सकस आहार उपलब्ध करून देणे, गरोदर आणि स्तनदा मातांना पौष्टिक आहार पुरवणे, किशोरवयीन मुलींना शारीरिक स्वच्छतेची माहिती देणे, लसीकरण या आणि अशा अनेक मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचं महत्वाचं कार्य गेल्या 20 वर्षांपासून श्रीमती मंगला करत आहेत.

कोरोना संकटाच्या काळात मुंबईतील वस्त्यांमध्ये कोरोनाविषयक जनजागृती करण्याचं महत्वाचं काम श्रीमती मंगला यांनी केलं. तसंच कोरोनाबधित झाल्याने घरातच क्वारंटाईन झालेल्या कुटुंबाना अन्नधान्य, भाज्या आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करून, लक्षणे आढळणाऱ्या स्त्री-पुरुषांना पालिकेच्या आरोग्य केंद्रात पोहोचण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत करणे, अशी अनेक जोखमीची काम त्यांनी या काळात केली आहेत. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी समाजसेविका श्रीमती पद्मा कपूर यांचा सत्कार खासदार शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या वतीने करण्यात आला होता.

Leave a comment

0.0/5