Skip to content Skip to footer

अशी चूक होणार नाही, तमाम मराठी माणसांची माफी मागतो!

अशी चूक होणार नाही, तमाम मराठी माणसांची माफी मागतो!

टीव्ही रियालिटी शो बिग बॉस १४ च्या पर्वातील एका भागात स्पर्धक, गायक कुमार सानू यांचा मुलगा गायक जान कुमार सानू याने मराठी भाषेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक स्तरावरून संताप व्यक्त केला आहे. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी जान सानू याच्या वक्तव्याबद्दल निषेध व्यक्त करत इशारा वजा समज दिली होती. त्यानंतर कलर्स वाहिनीच्या व्यवस्थापकांनी शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली होती. या कार्यक्रमात जानला त्याच्या चुकीची जाणीव करून देत त्याला नॅशनल टेलिव्हिजनवर माफी मागावी लागली. जानने मराठी लोकांची माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही, अशी त्याने ग्वाही दिली.

 

यावेळी जान कुमार सानू म्हणाला की, मी नकळत एक चूक केली त्यामुळे मराठी माणसांच्या भावनाला धक्का लागला. मराठी माणसांना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी यासाठी माफी मागतो. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही, असं त्याने सांगितले.

 

बुधवारी सदर बिग बॉस मालिकेचा भाग प्रदर्शित झाल्यानंतर सर्व स्तरातुन त्याच्या या मराठी द्वेषाचा निषेध करण्यात आला होता. तसेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी निषेध नोंदवत त्याला कार्यक्रमातून बाहेर काढण्याची मागणी केली होती. मात्र जाण सानू याने केलेल्या कृत्याची माफी मागितलेली आहे.

Leave a comment

0.0/5