Skip to content Skip to footer

टप्याटप्याने शाळा सुरू करण्यास राज्य सरकारचा हिरवा कंदील; शिक्षण मंत्र्यांची माहिती.

टप्याटप्याने शाळा सुरू करण्यास राज्य सरकारचा हिरवा कंदील; शिक्षण मंत्र्यांची माहिती.

कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर असल्याने शाळा, महाविद्यालये, क्लासेस व सर्व शैक्षणिक संस्था बंद होत्या. परंतु विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अभ्यास वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

 

परंतु शाळा बंद असल्याने शिक्षक व सोबतच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. राज्य सरकारने पुन:श्च हरी ओम म्हणत विविध क्षेत्र सुरू केले. पण शाळा सुरू करण्याबाबत शासन घाईगडबडीने निर्णय घेणार नाही व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. परंतु आता ओसरत असलेला रुग्णवाढीचा प्रभाव पाहता महाराष्ट्रात शाळेतील वर्ग दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

 

नववी ते बारावीचे विद्यार्थी प्राथमिक विद्यार्थ्यांच्या मानाने अधिक महत्वाच्या टप्प्यावर असल्याने या महत्वाच्या वर्षांच्या शाळा सुरू करण्याचा प्रामुख्याने विचार केला जाईल, असे देखील गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a comment

0.0/5