Skip to content Skip to footer

एफआरपीवरून आमदार बच्चू कडू चढले आयुक्तालयाच्या गच्चीवर……

ऊसाच्या पिकाच्या एफआरपीच्या प्रश्नावरून आमदार बच्चू कडू यांनी जोरदार आंदोलन छेडलं आहे. पुण्यातील साखर आयुक्त कार्यलयाचा ताबा घेतला आहे. बच्चू कडू यांचे समर्थक आणि आंदोलकांनी आयुक्त कार्यालच्या गच्चीवर पोहोचून जोरदार आंदोलन सुरू ठेवलं आहे. आमदार बच्चू कडू हे नेहमी आपल्या अजब आदोलनाच्या स्टाईलमुळे चर्चेत राहत असतात. त्यामुळे अनेक सरकारी बाबू हे आ. कडू यांना दचकून असतात. लोकसभा निवडणुकीला सुद्धा त्यांनी एका आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या पत्नीला लोकसभेला आपल्या पक्षातून उतरविले होते. परंतु त्यांचा प्रराभव झाला होता.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून कारखानदारांनी एफआरपीचा पहिला हफ्ता देखील अद्याप दिलेला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहेत. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत, कारखानदार त्यांना एफआरपी न दिल्याने हे आंदोलन छेडण्यात आल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. साखर संकुलात आयुक्तांशी बच्चू कडू यांनी बोलणी केली. थकित रक्कम 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे आश्वासन आयुक्तांकडून देण्यात आल्याची माहिती मिळते आहे

Leave a comment

0.0/5