Skip to content Skip to footer

राज्यपाल नियुक्ती १२ सदस्यांची यादी मुख्यमंत्री ठाकरे राज्यपालांकडे सुपूर्द करणार….!

राज्यपाल नियुक्ती १२ सदस्यांची यादी मुख्यमंत्री ठाकरे राज्यपालांकडे सुपूर्द करणार….!

विधानपरिषदेसाठी १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस ठाकरे सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली जाणार आहे. आज, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुपूर्द करणार आहेत. बंद लिफाफ्यात कोणती नावं आहेत? त्याचबरोबर राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार, की यावर सुद्धा राजकारण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावमध्ये बोलताना विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा नावे ठरल्याची माहिती दिली. मात्र, ही नावे गुपित आहेत ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. योग्यवेळी ती नावे आम्ही जाहीर करण्यात येणार असल्याचे अनिल देशमुख यांनी बोलून दाखविले होते.

राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचं नाव असणार का? याबाबत देखील राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप खडसेंचं नाव निश्चित झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंतिम क्षणी खडसेंचं नाव येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a comment

0.0/5