Skip to content Skip to footer

मुंबईत बेस्ट सेवेत रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू…….!

मुंबईत बेस्ट सेवेत रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू…….!

मुंबईतील बेस्टच्या सेवेत गेलेल्या सोलापुरातील एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. भगवान गावडे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गावडे हे सोलापुरातील मंगळवेढा आगारात वाहक म्हणून काम करत होते.

मुंबईत बेस्ट बसची सेवा देण्यासाठी सोलापूर विभागातील 100 एसटी कर्मचारी गेले होते. काही दिवसांपूर्वी ते सर्व कर्मचारी सोलापुरात परतले. यानंतर मंगळवेढा आगारातील वाहक भगवान गावडे यांना मूळव्याधीचा त्रास होत होता. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली.

त्यामुळे वाहतूक नियंत्रक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना उपचार मिळावा यासाठी वारंवार तक्रार केली होती. मात्र त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने भगवान गावडे यांचा कुर्ला येथील रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान भगवान गावडे यांच्या मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही.

Leave a comment

0.0/5