Skip to content Skip to footer

शिवसेना मंत्र्यांची बाळासाहेबांना अनोखी आदरांजली ७१ हजार सदस्यांची नोंदणी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८ व्या स्मुर्तीदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार दादर, शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मुर्तीस्थळाचे दर्शन घेतले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले होते.

याच दरम्यान शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बाळासाहेबांच्या स्मुर्तीदिनानिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली आहे. पक्षातर्फे राबवलेल्या सदस्य नोंदणी मोहिमेत पाटण विधानसभा मतदार संघात १ लक्ष सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प त्यांनी केला होता.

त्यानुसार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्‍मृतिदिन व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील शिवसेना सदस्यांची नोंदणी केलेले ७१ हजार अर्ज शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांचेकडे सुपूर्द केले आहे. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वेळ कमी मिळाल्याने उर्वरीत २९ हजार सदस्यांचे नोंदणी अर्ज महिन्याभरात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5