Skip to content Skip to footer

अखेर उर्मिला मार्तोडकर यांचा शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश

अखेर उर्मिला मार्तोडकर यांचा शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश

विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश आज केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अनिल सरदेसाई यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. उर्मिला यांचा भगवा मास्क यावेळी लक्षवेधी ठरला. पक्षप्रवेशानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचे उर्मिला मातोंडकर यांनी सांगितल आहे.

विधान परिषदेत शिवसेनेचा आवाज उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने अधिक बुलंद होणार आहे. अभिनेत्री कंगना रनौतने शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेवर हल्लाबोल चढवला असताना उर्मिला यांनी ठाम भूमिका घेत कंगना सुनावलं होतं. त्यानंतर काही महिन्यातच उर्मिला मातोंडकर यांना खुद्द उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेची ऑफर दिली.

उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, मराठी चेहरा, लोकप्रियता, सर्व भाषांवर प्रभुत्व, राजकीय समज आणि राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी कलाकार कोट्याचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना विधानपरिषेदवर पाठवल्याचं म्हटलं आहे. एक वाजता पक्षप्रवेशाची ठरलेली वेळ अचूक पाळून उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या टायमिंगचीही चुणूक दाखवली. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा सर्वच करत आहे.

Leave a comment

0.0/5