Skip to content Skip to footer

अखेर जीमेल, गुगल आणि युट्यूब सुमारे ५० मिनिटांनी पूर्ववत

आमची सेवा पूर्ववत झाल्याचं ट्विट गुगलने केलं आहे

गुगल हे जगप्रसिद्ध सर्च इंजिन, त्यांची जीमेल सेवा आणि युट्यूब जगभरात अनेक ठिकाणी डाऊन झालं होतं. मात्र आता या तिन्ही सेवा पूर्ववत झाल्या आहेत. गुगल वर्कस्पेस या ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन सगळ्या सेवा पूर्ववत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सुमारे ४५ मिनिटं गुगल, जीमेल आणि युट्यूब या सेवांना एरर येत होता. आता मात्र या सेवा पूर्ववत झाल्या आहेत अशी माहिती गुगलतर्फे देण्यात आली आहे. तसेच गुगलने युजर्सचे आभारही मानले आहेत.

 

अनेक युजर्सना गुगल या सर्च इंजिनवर माहिती सर्च करताना अडचणी येत होत्या. तसंच यूट्युबवरही एरर येत होता आणि जीमेलवरही एरर होता. आम्ही असुविधेबद्दल खेद आहे, लवकरच आम्ही पूर्ववत सेवा देऊ या आशयाचा मेसेज युट्यूब, जीमेल आणि गुगलवर येत होता. काही ठिकाणी गुगल हे सर्च इंजिन व्यवस्थित सुरु होतं. मात्र जगातल्या अनेक ठिकाणी गुगल, जीमेल आणि युट्यूब या तिन्हीवर अॅक्सेस करण्यास युजर्सना समस्या जाणवत होत्या. हा फटका नेमका कशामुळे बसला आहे? गुगल, युट्यूब आणि जीमेल का डाऊन झालं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

युट्यूबवर लॉग इन केल्यानंतरही युजर्सनला “something went wrong” हा मेसेज येत होता. जगातल्या काही देशांमध्ये गुगल हे सर्च इंजिन व्यवस्थित सुरु आहे असंही समजतं होतं. मात्र जीमेल आणि युट्यूब यांना एरर येतो होता. दरम्यान युट्यूब डाऊन हा ट्रेंडही ट्विटरवर सुरु झाला. याच प्रमाणे गुगल डाऊन आणि जीमेल डाऊन हे ट्रेंडही सुरु झाले आहेत. युट्यूब, जीमेल आणि गुगल डाऊन झाल्यानंतर जे ट्रेंड सुरु झाले आहेत त्यामध्ये अनेक युजर्सनी मीम्सही तयार करुन ट्विटरवर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. मागील काही वेळापासून जीमेलवर क्लिक केल्यास किंवा रिफ्रेश केल्यास Temporary Error (500) असा संदेश येत होता.

Leave a comment

0.0/5