Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचे बिल थकीत नाही, मनपाची माहिती

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचे बिल थकीत नाही, मनपाची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोंबत आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांच्या शासकीय निवासस्थानची पाणीपट्टी थकली असल्याची माहिती समोर येत आहे. पाणीपट्टीची ही रक्कम २४ लाख ५६ हजार ४६९ इतकी आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी काढलेल्या माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. यामुळे मुंबई महापालिकेने वर्षा बंगला डिफॉल्टर यादीत टाकला होते मात्र यावर आता मुंबई मनपाने स्पष्टीकरण दिले आहे.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेले वर्षा बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी राहिलेली नाही. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेले वर्षा बंगला आणि त्याला संलग्न असलेले तोरणा या बंगल्याचा समावेश आहे. या बंगल्याचे पाणी बिल थकीत असेलेले वृत्त खोटे आहे. बृहमुंबई महानगर पालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. या अहवालात दोन्ही बंगल्याची थकबाकी निरंक असल्याची वस्तुस्थिती स्पष्ठ करण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5