Skip to content Skip to footer

पवार साहेबांप्रमाणं काम करणारा नेता देशात दुसरा कोणी नाही – अजित पवार

पायाला भिंगरी बांधल्यासारखे पवारसाहेब आज काम करत आहेत. या वयातही प्रचंड काम करणारा नेता देशात दुसरा कुणी नाही हे नाकारता येणार नाही असे उदगार राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहे. आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी राष्ट्र्वादीत जाहीर प्रवेश केला होता. त्यांच्या सोबत असंख्या कार्यकर्त्यांनी राष्ट्र्वादीत प्रवेश केला.

या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. आज राजकीय जीवनात पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ३० वर्षे काम करत आहे. यामध्ये अनेक लोकांची ओळख होत असते. त्यामध्ये जनसुराज्य पक्षाचे काम करताना राजीव आवळे यांचे काम मी पहात आलो आहे. ते गरीब आणि वंचित वर्गासाठी काम करत आहेत असेही अजित पवार म्हणाले.

या पुढे आता कोल्हापूर जिल्हयात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीमध्ये अधिक सदस्य कसे येतील असे काम करावे लागणार आहे असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी राजीव आवळे यांना केले.

Leave a comment

0.0/5