Skip to content Skip to footer

आघाडी सरकारने घेतलेले निर्णय काहींच्या जास्तच जिव्हारी लागले आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी आरे येथील कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग (पूर्व) येथील जागेत स्थलांतरीत करण्याचा निर्णय दिला होता. या स्थलांतरानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी जागेवर आपला हक्क असल्याचे सांगत केंद्र आणि राज्य सरकार असा नवा वाद निर्माण झाला होता. त्यात आता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले आहे.

‘कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर न्याय व विधी खाते, अटर्नी जनरल, मुख्यमंत्री एकत्र बसून पुढे काय करायचं हे ठरवतील. काम सुरू करण्यासाठी जे करायचं आहे. त्यावर विचार करून निर्णय होईल, असे अजित पवार म्हणाले होते.

तसेच केंद्र आणि राज्यसरकार असो विकासकामांमध्ये कुणीच राजकारण किंवा अडथळा करु नये. माझ्या अनेक वर्षाच्या राजकीय जीवनात शरद पवार यांची ५०-५५ वर्षाची राजकीय कारकीर्द पाहिलेली आहे. मी ३० वर्ष राजकीय क्षेत्रात काम करत आहे. मी कधीही विकासकामात राजकारण आणलं नाही. उलट मदतच करत असतो, असे बोलून दाखविले.

 

Leave a comment

0.0/5