Skip to content Skip to footer

भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

केंद्राने लागू केलेल्या नव्या कृषी कायदायाविरोधात मागच्या अनेक दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. या संदर्भात शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात कृषी कायद्यावरून चर्चा सुद्धा झालेली आहे. मात्र अद्याप यावर तोडगा काढणे केंद्र सरकारला जमलेले नाही. त्यातच आता कृषी कायद्यावरून भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांने टीका करून भाजपाला घरचा आहेर दिला आहे.

भाजपचे माजी केंद्रीय मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांनी शुक्रवारी नव्या शेतीविषयक कायद्यांना विरोध दर्शवला. नव्या कायद्यांविरोधात सुरू असलेलं आंदोलन हे आता केवळ शेतकऱ्यांपुरतंच मर्यादित नसून सर्वांचे आंदोलन झाले आहे असे ते म्हणाले. आज नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या विरोधात निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत.

Leave a comment

0.0/5