शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ग्राम पंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती आखत आहेत. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून शिवसैनिक जिल्हाधिकारी आणि पदधिकारी यांच्या सोबत बैठकांचा सपाटा लावला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल जिल्हा प्रमुखांशी चर्चा करुन ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनेला नंबर वन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत संपर्कप्रमुखांना रणनीती बनवण्याचे आदेश दिले आहे. ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेनेची खलबतं सुरु आहेत.
दरम्यान आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व शिवसेना संपर्कप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली आहे. शिवसेना महाराष्ट्रातील १४ हजार २३४ ग्राम पंचायतींच्या निवडणुका लढवणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होत आहे.