Skip to content Skip to footer

दरोड्याचे आणि बुवाबाजीचे प्रकार नगर जिल्ह्यातील थांबवा – नीलम गोऱ्हे

नगर जिल्हयात मोठ्या प्रमाणात दरोड्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ते वेळीच आटोक्यात आणण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार करा अशी मागणी शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केली आहे.

तसेच नगर जिल्ह्यात बुवाबाजीच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे गोऱ्हे यांनी नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्रही लिहिले आहे. गोऱ्हे आपल्या पत्रात लिहितात की, नगर जिल्ह्यात दरोडा, महिला अत्याचाराच्या प्रमाणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तसेच बुवाबाजीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोठेवाडी असो कोपर्डी येथील घटनांचा मागोवा घेतला तर अशा घटनांवर निर्बंध आणण्यासाठी पोलीस प्रशासनास विशेष प्रयत्न करणे आवश्यक वाटत आहे.

जमिनीतून सोने काढून देतो, भरपूर धनलाभ करुन देण्याचे आमिष भक्तांना दाखवणार्‍या भोंदूबुवाला अखेर पोलिसांनी अटक केली. अशी अनेक प्रचलित नावे वापरुन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. तसेच भोंदू व्यक्तीने जर कोणत्या महिलेवर अत्याचार केला असेल तर त्यांना पोलिसांनी संपर्क करावा. पीडितांचे ताण गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5