Skip to content Skip to footer

बाळासाहेब सानप यांच्या भाजपा पक्षप्रवेशाने अनेक भाजपा पदाधिकारी नाराज लवकरच देणार राजीनामा

शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर आता त्यांच्या जिल्ह्यात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे. यावरून भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.कारण, अनेक नाराज नगरसेवक भाजपला सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत आहेत .

सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक नगरसेवक नाराज असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली आहे. हे नाराज नगरसेवक पक्षाला सोडचिट्टी देण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठा वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a comment

0.0/5