Skip to content Skip to footer

इथे ईडीच्या नोटिस दिल्या जातात शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयाच्या बाहेर लावले बॅनर

महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि आमदारांना ईडीच्या नोटीस दिल्यापासून राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात शिवसैनिकांनी आपल्या जुन्या स्टाइलमध्ये ईडी कार्यलयाबाहेर भाजप प्रदेश कार्यालयाचा बॅनर लावला होता.

त्यात शिवसैनिकांनी सोमवारी भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेर ” ED येथे भाजपा विरोधी लोकप्रतिनिधींना नोटीसा दिल्या जातात’ अशा आशयाचे बॅनर भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेर झळकावले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा असा वाद मुंबईच्या रस्त्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे.

सोमवारी दुपारी शिवसैनिकांनी ईडीच्या कार्यालयाचे नावच बदलून टाकले. ईडीच्या कार्यालयावर ‘भाजपा प्रदेश कार्यालय’ असे सांगत बँनरच लावण्यात आले. शिवसैनिकांच्या या स्टाइलमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. तर दुसरीकडे डोंबिवलीत #wesupportsanjayraut चे बॅनर लावण्यात आले होते.

Leave a comment

0.0/5