Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली स्व. सूर्यकांत महाडिक यांना श्रद्धांजली

शिवसेना अंगीकृत भारतीय कामगार संघटनेचे नेतृत्व करणारे माजी आमदार सूर्यकांत महाडिक यांचे सोमवारी रात्री ८.३० वाजता मुंबईतील चेंबूर येथील झेन रुग्णालयात अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कामगार क्षेत्रातील भक्कम नेतृत्व शिवसेनेने गमावल्याची भावना सर्व स्थरातून व्यक्त होत आहे.

महाडिक यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी घाटला गाव, चेंबूर येथे आज सकाळी ७ ते १० या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार होते. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूर घाटला गाव येथे महाडिक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे शेवटचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. तसेच मुख्यमंत्र्यांनी महाडिकांच्या परिवाराचे सांत्वन केले होते.

Leave a comment

0.0/5