Skip to content Skip to footer

पहिल्या दिवशी साडेबारा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार – किशोरी पेडणेकर

देशभरात ( दि १६ जानेवारी) शनिवारपासून कोरोना लसीकरण केले जाणार आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात १३ ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही कोरोना लसीकरणासाठी सज्ज झाला आहे.
मुंबईतील ९ केंद्रांवर लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरणासाठी परेलच्या पालिका कार्यालयातून कोरोना लस केंद्रावर पाठवण्यात आली आहे. तसेच लस वाहतूक करणाऱ्या वाहनांना विशेष सुरक्षा पुरवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांनी दिली.

मुंबईत उद्या ९ ठिकाणी कोरोना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी मी उद्या स्वत: वांद्रे कुर्ला संकुल मध्ये जाणार आहे. यासाठी ज्या लोकांनी नोंदणी केली आहे. त्यांना ३ ठिकाणी ओळखपत्र दिले जाईल. त्यानंतर लसीकरण करण्यात येईल,” अशी माहिती किशोरी पेडणेकरांनी दिली.

ज्या लोकांना कोरोना लस घ्यायची आहे, त्यांचे सर्वात आधी कॉउंसिलिंग केले जाईल. कोरोना लस घेतल्यानंतर जर कोणाला त्रास झाला, तर त्याला तात्काळ अतिदक्षता विभाग मध्ये दाखल करण्यात येईल. यासाठी सर्व सोय करण्यात आली आहे.तसेच एखाद्या व्यक्तीने कोरोना लस घेतल्यानतंर ती ३० मिनिटात घरी जाईल. तसेच पुढील ४८ तासात त्याला त्रास झाल्यास कर्मचारी माहिती घेतील.

Leave a comment

0.0/5