Skip to content Skip to footer

बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार – संजय राऊत

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले ते काबिल असतील. त्यांचे मी स्वागत करतो, असे सांगतानाच बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार देण्यात आला असावा, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

राऊत यांनी पद्म पुरस्कारावरून मोदी सरकारला चिमटा काढला आहे. ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले ते काबिल असतील. त्यांचे मी स्वागत करतो, अशी खोचक टीका राऊत यांनी केली. इतकं मोठं राज्य आहे. त्यात इतके लोक काम करतात. पण महाराष्ट्रातील केवळ ६ लोकांना पुरस्कार देण्यात आला आहे. इतर राज्यातील नावं पाहिली आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार दिल्याबद्दल राऊतांना विचारले तेव्हा त्यावर बुलेट ट्रेन दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असावा. महाराष्ट्राने जी बुलेट ट्रेन नाकारली, त्यासाठीच हा पुरस्कार असावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

Leave a comment

0.0/5